Sunday, March 6, 2011

तुझ्या माझ्यासवे .........विडंबन

(संदीप आणि सलील ह्यांना नम्र वंदन करून)

तुझ्या माझ्यासवे कधी गायचा माउसहा -३

तुला बोलावता पोचायचा "मेनेजर" हा -२

तुझ्या माझ्यासवे कधी गायचा माउसहा -३

पडेना पापणी पाहून "कोडींग करताना" तुला -३

कसा होता नि नव्हता व्हायचा कोडहा -

तुझ्या माझ्यासवे कधी गायचा माउसहा -३

तुला मी थांब म्हणताना -२ तुला आडवायला

तुला मी थांब म्हणताना तुला आडवायला

कसा वेळीच तेव्हा -२ यायचा "मिटिंगचा मेल हा "

तुझ्या माझ्यासवे कधी गायचा माउसहा -३

ला ला ला ला ला ला ला ला

मला पाहून "बिझी" वाढायचा रुसवा तुझा -३

कश्या युक्त्या मला शिकवायचा (हलकट) कलीगहा -२

तुझ्या माझ्यासवे कधी गायचा माउसहा -३

कशी भर रिलीसवेळी आग माझी व्हायची-३

तुला जेव्हा असा -३ थांबवायचा मेनेजर हा

तुला जेव्हा असा थांबवायचा मेनेजर हा

तुझ्या माझ्यासवे कधी गायचा माउसहा -३

आता पीसीवर उरलेल्या खुणा

कधी स्मरणे अशी -२ ठेवायचा मेनेजरहा

कधी स्मरणे अशी , कधी लवकर घरी जाऊ द्यायचा मेनेजर हा

तुझ्या माझ्यासवे कधी गायचा माउसहा -३

No comments:

Post a Comment